नवी दिल्ली : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा धुराळा उडत असल्याचे पाह्यला मिळत आहे. मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्याकरता सर्वपक्षीयांकडून मोठं मोठे आश्वासने देण्यात येत आहेत. त्यासाठी जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान, सत्तेवर आल्यास बजरंग दलावर बंदी आणणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने स्पष्ट केली होती. यावरून भाजपाने काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. तर पुन्हा एकदा काँग्रेसने हनुमान मंदिरांचा मुद्दा उचलून धरला आहे.
काँग्रेसचे राज्य युनिट प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी प्रचारा दरम्यान, “सत्तेवर आल्यास आम्ही भगवान हनुमानाच्या नावाने विशेष योजना सुरू करू. प्रत्येक तालुक्यात तरुणांच्या मदतीसाठी त्यांच्या नावाने कार्यक्रम सुरू करू. म्हैसूर आणि बंगळुरूत २५ मंदिरे आहेत. भाजपा नेत्यांनी या मंदिरांची काळजी घेतली का?, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, “पक्ष राज्यभरातील अंजनेय (हनुमान) मंदिरांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. अंजनाद्री टेकडीवर असलेल्या भगवान हनुमानाच्या जन्मस्थानाचा विकास करण्यासाठी काँग्रेस अंजनाद्री विकास मंडळ तयार करणार आहे”, असेही ते म्हणाले.
ಮೈಸೂರಿನ ಚಾಮುಂಡೇಶ್ವರಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ತಾಯಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆದು ರಾಮಭಕ್ತ ಹನುಮನಿಗೆ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿದೆ.
ಹನುಮನೆಂದರೆ ಶಕ್ತಿ, ಹನುಮನೆಂದರೆ ಶಾಂತಿ, ಹನುಮನೆಂದರೆ ಜಗವ ಕಾಯೋ ಕಾಂತಿ. pic.twitter.com/NTYLdVpLON
— DK Shivakumar (@DKShivakumar) May 4, 2023
“काँग्रेसने नेहमीच हनुमानाची भक्ती केली आहे. पंरतु देवाच्या नावाखाली संघटना स्थापना करून आम्ही कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. अशा शक्तींवर आम्ही कायदेशीर कारवाई करू. आम्ही आमच्या जाहीरनाम्यातच हे सांगितलं आहे. परंतु, भाजपाला हा मुद्दा भावनिक बनवायचा आहे”, असंही शिवकुमार म्हणाले.
काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी मनीष तिवारी यांनी गुरुवारी सांगितले की, “मी दिवसातून दोनदा ‘हनुमान चालीसा’ चा जप करतो. परंतु भाजपा नेहमीच हनुमान चालीसा पठणावरून राजकारण करते.” असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.