पुणे – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या विक्रम भावे याचा जामीन सत्र न्यायाधीश आर. एन. पांडे यांनी फेटाळला.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना पुरावा नष्ट करण्याचा सल्ला दिल्याच्या आरोपावरून आरोपींचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांना तर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंघाने रेकी केल्याच्या आरोपावरून विक्रम भावे याला सीबीआयने गेल्या काही महिन्यांपूर्वी अटक केली होती.
दरम्यान दोघांची न्यायालयीन कोठीत रवानगी झाल्यानंतर अॅड. पुनाळेकर यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने अटी-शर्तींवर अॅड. पुनाळेकर यांना जामीन मंजूर केला होता. दरम्यान विक्रम भावे याने देखील जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, तो न्यायालयाने फेटाळला.