“बागी 3′ रिलीज झाला आणि करोनाचा कहर सुरू झाला. त्यामुळे थिएटरवर या सिनेमाला विशेष प्रभाव दाखवता आला नाही. त्यामुळे आता हा सिनेमा डिजिटल प्लॅटफोर्मवर रिलीज केला गेला आहे. आता हा सिनेमा लॉकडाऊन उठवल्यानंतर पुन्हा थिएटरवर रिलीज केला जाणार नाही, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. कारण लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे.
त्यानंतरही आता इतक्यात थिएटर लगेचच उघडण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने “बागी 3′ ला डिजीटल प्लॅटफॉर्मवरच रिलीज करणे व्यवहारिक असल्याचे निर्मात्यांना लक्षात आले. अहमद खान दिग्दर्शित ‘बागी 3’मध्ये टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
यापूर्वी “अंग्रेजी मीडियम’च्या बाबतीत देखील हा निर्णय घेतला गेला आहे. इरफान खानच्या आजारपणानंतरच्या या सिनेमाला थिएटरवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे वाटल्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केले गेले आहे. अजून त्याचा प्रतिसाद कसा काय आहे, हे काही समजू शकलेले नाही. यापुढच्या काळात जे सिनेमे रिलीज केले जाणार होते, त्यांचे भवितव्य अधांतरीच असल्याने त्यांनाही डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जाण्याची शक्यता आहे.