Bageshwar Dham : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांचे नाव देशभर गाजत असल्याचं दिसून येत आहे. धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) हे सतत चर्चेत असतात. कुणाच्याही मनातलं ओळखण्याची अनोखी सिद्धी या बाबांना अवगत असल्याची चर्चा आहे.
त्यावरुन त्यांना अनेकांनी आव्हान देखील दिले आहे. आणि याच कारणांमुळे धीरेंद्र शास्त्री नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी देशभरातून लोक येत असतात.
दरम्यान, आता पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांचे नाव चर्चेत आलं आहे. आणि त्याच कारण देखील तितकंच खास आहे. आपल्या कडे येणाऱ्या भाविकांचं मन वाचन करणारे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम बाबा यांचा दरबार छत्रपती संभाजीनगर मध्ये भरणार आहे. तीन दिवस हा दरबार भरणार आहे.
बागेश्वर धाम बाबा यांच्या श्री राम, श्री हनुमान कथेला रेल्वेस्टेशन येथील अयोध्यानगरी मैदानावर प्रारंभ झाले आहे. रविवारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांचे शहरात अगमन झाले.
चिकलठाणा विमानतळावर येताच हनुमानांची गदा घेत त्यांनी जय श्रीरामची घोषणा दिली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड व गृह निर्माण मंत्री अतुल सावे यांनी महाराजांचे स्वागत केले.