Baba Vanga Predictions 2024: बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेगा यांचे नाव जगातील प्रसिद्ध भविष्यकारांमध्ये समाविष्ट आहे. बाबा वेंगा यांना बाल्कनचा नॉस्ट्राडेमस म्हणतात. त्यांच्या भाकितांवर संपूर्ण जगाचा विश्वास असल्याचे सांगितले जाते. बाबा वेंगाची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. बाबा वेंगा यांचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी स्ट्रुमिका, उत्तर मॅसेडोनिया येथे झाला. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. 11 ऑगस्ट 1996 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियनचे विघटन, अमेरिकेतील अल कायदा या दहशतवादी संघटनेने केलेला हल्ला यासह अनेक भाकिते केली होती, जी अगदी खरी ठरली आहेत. असे म्हणतात की, बाबा वेंगा भविष्य पाहू शकत होते. मृत्यूपूर्वी त्यांनी सन 5079 पर्यंत भविष्यवाणी केली होती. त्यांनी जगाच्या अंतापासून युद्ध आणि आपत्तीपर्यंतचे भाकीत केले. आता त्यांची 2024 सालची भविष्यवाणी (Baba Vanga 2024 Predictions)) लोकांना घाबरवत आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, बाबा वेंगाची 85 टक्के भविष्यवाणी खरी ठरली आहे. असे म्हणतात की, लहानपणी एका प्राणघातक वादळात त्यांची दृष्टी गमावल्यानंतर त्यांना शक्ती प्राप्त झाली. बाबा वेंगाच्या भाकितांची आजही चर्चा होते.
बाबा वेंगा यांनी म्हटले आहे की, 2024 मध्ये एक मोठा देश जैविक शस्त्रांची चाचणी किंवा हल्ला करेल. याशिवाय युरोपमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.
2024मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला हादरवून सोडणारे मोठे आर्थिक संकट येईल, असे भाकीत बाबा वेंगा यांनी केले होते. त्यांनी अनेक कारणे सांगितली. यामध्ये कर्जाची वाढती पातळी, वाढता भू-राजकीय तणाव आणि आर्थिक शक्तीचे पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतर यांचा समावेश आहे. यासोबतच बाबा वेंगा यांनी 2024 साठी हवामानाशी संबंधित भयानक घटना आणि नैसर्गिक आपत्तींची भविष्यवाणी केली होती.
याशिवाय सायबर हल्ल्यांमध्ये वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रगत हॅकर्स पॉवर ग्रीड आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट्ससारख्या गंभीर पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल.
2024 वर्षासाठी त्यांनी काही सकारात्मक अंदाजही व्यक्त केले. त्यांच्या मते 2024मध्ये वैद्यक क्षेत्रात यशाची अपेक्षा आहे. यामध्ये अल्झायमर सारख्या आजारांसाठी नवीन उपचारांचा समावेश आहे आणि 2024 पर्यंत कर्करोगावरील संभाव्य उपचारांचा समावेश आहे.