लखनौ – भाजपनेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत धक्काबुक्की करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सोमय्या यांना मारहाण करण्यात आली. हे प्रकरण ताजं असताना उत्तर प्रदेशात भाजपच्या स्टार प्रचारक आणि कुस्तीपट्टू बबिता फोगाट यांच्या कारवर हल्ला करण्यात आला.
उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपची स्टार प्रचारक आणि जागतिक कुस्तीपटू बबिता हिच्या ताफ्यावर मेरठमध्ये हल्ला करण्यात आला. मेरठमधील सिवालखास विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान ही घटना घडली.
भाजपच्या उमेदवाराला स्थानिकांनी तीव्र विरोध केला. त्यातून तणाव निर्माण झाला आणि संतप्त जमावाने फोगाट यांच्या ताफ्यावर हल्ला केला. यावेळी दगडफेकही झाल्याचे सांगण्यात येत असून अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या हल्ल्यातून बबीता फोगाट ही बचावली असून तिला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
तत्पर्वी पुणे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी सोमय्या महापालिकेत येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शिवसैनिक महापालिकेत जमले होते. यावेळी काही समजण्याच्या आतच धक्काबुक्की सुरू झाली. त्यानंतर एवढा गोंधळ झाली की सोमय्या यांचे सुरक्षा रक्षक बाजूला फेकले गेले. त्यानंतर सोमय्या यांना धक्काबुक्की करुन खाली पाडले आणि मारहाण करण्यात आली.
एकंदरीतच एका दिवसांत भाजपच्या नेत्यांवर हल्ला होण्याच्या दोन घटना देशात घडल्या आहेत.