Babar Azam – पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम मागील काही दिवसापासून बऱ्याच अडचणींचा सामना करत आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला मागील काही काळात मायदेशात एकदिवसीय आणि कसोटी मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे बाबर आझमच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर बाबरने आता कर्णधार पदाची सूत्रे इतर खेळाडूंकडे द्यावे, असे सल्लेही त्याला दिले जात आहेत. त्याचबरोबर बाबरच्या कर्णधारपदाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे, संकेतही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिले आहेत.
महिलांची 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा; भारताचा अमिरातीवर मोठा विजय
दरम्यान, बाबर आझमच्या अडचणी आणखीच वाढवणारी घटना समोर आली आहे. बाबरचा एक एमएमएस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये बाबरच्या अंगावर कोणत्याही प्रकारचे कपडे नाहीत. वैयक्तिक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याने आता या प्रकरणाबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाबरने आपल्याच संघातील सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबत अश्लील वर्तन केले असल्याचे म्हटले जात आहे.
BCCI मालामाल! तब्बल एवढ्या कोटींची लॉटरी; जय शाह यांनी दिली माहिती
त्याचबरोबर बाबर आझम ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकला असल्याचेही म्हटले जात आहे. संघाच्या कर्णधाराचाच अशाप्रकारचा व्हिडिओ समोर आल्याने चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. कारण व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये बाबर आझम खूपच विचित्र अवस्थेत दिसत आहे. त्यामुळे आता हे प्रकरण बाबरच्या क्रिकेटवर कितपत परिणामकारक ठरतंय आणि बोर्ड त्याच्या प्रकरणाला गंभीरतेने घेईल की याकडे दुर्लक्ष करेल ते महत्वाचे ठरणार आहे.
Babar Azam sexting with gf of another Pakistan cricketer and promising her that her bf won’t be out of team if she keeps sexting with him is just 👎🏿
I hope allah is watching all this .
— Dr Nimo Yadav (@niiravmodi) January 15, 2023
याअगोदरही बाबर आझमवर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. या महिलेने माध्यमांसमोर बोलताना बाबरने आपले १० वर्ष लैंगिक शोषण केल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर तिने गरोदर राहिल्यावर बाबरने मला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असाही आरोप केला आहे. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बाबर आझमची क्रिकेटमधील लोकप्रियता वाढत असताना अशा प्रकरणामुळे त्याला अडचणींचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे.
So this lady has made accusations against Babar Azam “he promised to marry me, he got me pregnant, he beat me up, he threatened me and he used me”
Video courtesy 24NewsHD pic.twitter.com/PTkvdM4WW2— Saj Sadiq (@SajSadiqCricket) November 28, 2020