Women IPL – भारतात क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएल सारख्या स्पर्धेने प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात घर केलय. त्यामुळे भारतातील क्रिकेट पुढील येणाऱ्या काळात आणखी प्रभावी होईल यात थोडीही शंका नाही. काही महिन्यांपूर्वी आयपीएल स्पर्धेच्या मीडिया राईट्सचा लिलाव झाला. या लिलावाने अख्ख्या जगाला आयपीएलच्या लोकप्रियतेची जाणीव करून दिली. जागतिक क्रिकेटचं आर्थिक उलाढालीचं चक्र आयपीएलने आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले.
IND vs SL | कोहलीच्या ‘विराट’ शतकाने मोडला श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूचा मोठा विक्रम
त्यानंतर आता बीसीसीआयने आगामी काळात खेळलेल्या जाणाऱ्या महिला आयपीएलसाठीच्या मीडिया राईट्सची विक्री केली आहे. यावेळी रिलायन्सच्या मालकीच्या वायाकॉम-१८ प्रायव्हेट लिमिटेडने महिला आयपीएलचे मीडिया राईट्स (प्रसारणाचे अधिकार) विकत घेतले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर महिला आयपीएलचे मीडिया राईट्स जिंकल्याबद्दल त्यांनी वायकॉम-१८ चे अभिनंदनही केले आहे. महिला आयपीएलसाठी वायकॉम-१८ आणि बीसीसीआय यांच्यामध्ये पुढील पाच वर्षांसाठी ९५१ कोटींचा करार झाला आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून महिला आयपीएलच्या मीडिया राइट्सबद्दल माहिती दिली आहे. शाह यांनी लिहिले की, “महिला आयपीएलचे मीडिया हक्क वायाकॉम-१८ ने जिंकले आहेत. BCCI आणि महिला संघावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. पुढील पाच वर्षांसाठी (२०२३ ते २०२७ ) ९५१ कोटींचा करार झाला आहे आणि प्रत्येक सामन्यासाठी ७.९ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. महिला क्रिकेटसाठी हे खूप मोठे आहे.”
Congratulations @viacom18 for winning the Women’s @IPL media rights. Thank you for your faith in @BCCI and @BCCIWomen. Viacom has committed INR 951 crores which means per match value of INR 7.09 crores for next 5 years (2023-27). This is massive for Women’s Cricket 🙏🇮🇳
— Jay Shah (@JayShah) January 16, 2023
पुरुष आयपीएलचे मीडिया राईट्सवरही ताबा
यापूर्वी, वायकॉम-१८ ने पुरुषांच्या आयपीएलचे मीडिया राईट्सदेखील विकत घेतलेले होते. वायकॉम-१८ ने २३, ७५८ कोटी रुपयांना पुरुषांच्या आयपीएलचे मीडिया राईट्समधील डिजिटल हक्क मिळवले होते. पुरुषांच्या आयपीएलचे मीडिया राईट्स चार पॅकेजमध्ये विकले गेले होते. त्यापैकी तीन वायाकॉम-१८ ने ताब्यात घेतले. त्यांनी खरेदी केलेल्या सर्वच मीडिया राइट्समध्ये काही तरतुदी देखील आहेत.
लवकरच महिला आयपीएलची घोषणा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ५ ते २६ मार्च दरम्यान महिला आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. बीसीसीआयनेही महिला आयपीएल संघ निवडण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. महिला आयपीएलसाठीच्या पाच संघांची घोषणा २५ जानेवारीला होऊ शकते. यासाठी १० शहरांची निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी पुरुष आयपीएलच्या १० पैकी आठ फ्रँचायझींनी महिला संघ खरेदी करण्यात रस दाखवला आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्ससह अनेक फ्रँचायझी बोली लावण्यासाठी तयार आहेत.