बेनोनी – आयसीसीच्या 19 वर्षांखालील महिला विश्वकरंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या लढतीत भारतीय महिला संघाने संयुक्त अरब अमिरातीचा 122 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ड गटात सलग दोन सामने जिंकत भारतीय संघाने 4 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. तडाखेबंद फलंदाजी करणारी शफाली वर्मा सामन्याची मानकरी ठरली.
BCCI मालामाल! तब्बल एवढ्या कोटींची लॉटरी; जय शाह यांनी दिली माहिती
भारताने विजयासाठी दिलेल्या 220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमिरातीचा डाव 20 षटकांत 5 बाद 97 असा मर्यादीत राहिला. त्यांच्याकडून माहिका गौरने 26, लावण्या केणीने 24, तर कर्णधार तिर्था सतिशने 16 धावा केल्या. भारताच्या संमिश्र गोलंदाजीसमोर त्यांच्या अन्य कोणत्याही खेळाडूला दोनअंकी धावा करता आल्या नाहीत. भारताकडून पार्शवी चोप्रा, मन्नत कश्यप, तितास सिंधू व शबनम एमडी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता भारतीय संघाचा ड गटातील अखेरचा साखळी सामना बुधवारी स्कॉटलंडशी होणार आहे. त्यानंतर प्लेऑफचे सामने होणार आहेत.
तत्पूर्वी, अमिरातीची कर्णधार तिर्था सतिशने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी दिली. तीचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवताना सलामीवीर कर्णधार शफाली वर्माने श्वेत शेरावतच्या साथित आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने शतकी सलामी दिली. अवघ्या 34 चेंडूत 12 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी करत शफालीने 78 धावांची खेळी केली. अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात ती बाद झाली.
शफाली बाद झाल्यावर रिषा घोषने खेळपट्टीवर आल्या आल्या लगेचच अमिरातीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. तीचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. तीने 49 धावांच्या खेळीत 29 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार आशी फटकेबाजी करताना संघाचे द्विशतक फलकावर लावले. दुसरीकडे श्वेतानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. ती देखिल अशाच पद्धतीने फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाली.
Skipper @TheShafaliVerma bagged the Player of the Match award for her wonderful captain’s knock of 78 runs off just 34 deliveries 🙌🏻#TeamIndia clinch their second victory of the #U19T20WorldCup as they beat UAE by 122 runs👌🏻
Scorecard ▶️ https://t.co/lhJAqEEm4Y… #INDvUAE pic.twitter.com/g1nOJBD4TE
— BCCI Women (@BCCIWomen) January 16, 2023
पहिल्या सामन्या प्रमाणे याही सामन्यात तीने 74 धावांची वादळी खेळी करताना 49 चेंडूत 10 चौकार फटकावले. गोनगडी त्रीषाने 11 तर, तर सोनिया मेंधीयाने नाबाद 2 धावा केल्या. भारताने मर्यादीत 20 षटकांत 3 गडी गमावून 219 धावा केल्या. अमिरातीकडून समायरा धारनीधारका, इंदुजा नंदकुमार व माहिका गौर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.