PAK vs NZ T20I Series, Babar Azam : टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा आहे. या यादीत पाकिस्तान टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या IPL 2024 मध्ये खेळत आहेत आणि त्यानंतर त्यांना T20 World Cup 2024 मध्ये भाग घ्यायचा आहे. दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची T20I मालिका खेळायची आहे, जी 18 एप्रिलपासून सुरू होईल आणि ही मालिका पाकिस्तानमध्ये खेळली जाईल.
बाबर रोहित आणि कोहलीचा मोडू शकतो विक्रम…
विराट कोहलीने आतापर्यंत T20I क्रिकेटमध्ये 109 डावांमध्ये 4 हजार 037 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने 143 डावांमध्ये 3974 धावा केल्या आहेत. तर बाबर आझमने आतापर्यंत 103 डावात 3698 धावा केल्या आहेत. आता, बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20I मालिकेत 277 धावा केल्या तर तो हिटमॅनला मागे टाकेल आणि T20I मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल. दुसरीकडे, या मालिकेदरम्यान बाबरने 340 धावा केल्या तर तो T20I मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिला येईल आणि कोहलीला मागे टाकेल.
टी-20 क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा….
विराट कोहली : 4037 (109 डाव)
रोहित शर्मा : 3974 (143)
बाबर आजम : 3698 (103)
मार्टिन गप्टिल : 3531 (118)
पॉल स्टर्लिंग : 3491 (136)
IPL 2024 : एका IPL सामन्यातून चीअरलीडर्स किती कमावतात ? तुम्हालाही जाणून वाटेल आश्चर्य….
बाबरकडे आहे मोठी संधी…?
बाबर आझमकडे पुन्हा पाकिस्तान एकदिवसीय आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून तो 2024 च्या टी-20 विश्वचषकातही संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बाबर आझमकडे न्यूझीलंडविरुद्ध भरपूर धावा करण्याची उत्तम संधी आहे. कारण पाकिस्तान ही मालिका आपल्या देशात खेळणार आहे आणि न्यूझीलंडनेही या T20I मालिकेसाठी आपला दुसरा स्तराचा संघ पाकिस्तानला पाठवला आहे. न्यूझीलंडचे अनेक खेळाडू सध्या आयपीएल 2024 मध्ये खेळत आहेत आणि ते या मालिकेचा भाग असणार नाहीत. अशा परिस्थितीत या टी-20 मालिकेत रोहित आणि कोहलीला मागे टाकण्याची बाबर आझमकडे चांगली संधी आहे.