Kangana Ranaut – दसऱ्याच्या मुहूर्तावर कंगना राणावतने दिल्लीतील प्रतिष्ठित लवकुश रामलीला मैदानावर रावण दहन केले. कंगनाची निवड यासाठी कशी झाली यावरही सोशल मीडियावर अनेक युजर्सने प्रश्न उपस्थित केले. अशात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही यावरून प्रश्न उपस्थित केला यावर आता कंगनाने प्रतिउत्तर दिले आहे.
With a swimsuit picture and sleazy narrative you are suggesting that I have nothing else to offer except for my flesh to get my way in politics ha ha I am an artist arguably the greatest of all time in hindi films, a writer, director, producer, revolutionary right wing… https://t.co/dEcqamn7qO
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 26, 2023
अशात प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि माजी कॅबिनेट मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी या कार्यक्रमात रावण दहन करणाऱ्या अभिनेत्रीवर टिप्पणी केली आणि एक पोस्ट पुन्हा शेअर केली ज्यामध्ये कंगना बिकिनी घातलेली दिसत आहे. सुब्रमण्यम स्वामींनी लिहिले की, ‘रामलीलेच्या शेवटच्या दिवशी कंगनाला प्रमुख पाहुणे बनवणे हे मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्यासाठी अशोभनीय आहे, हे एक प्रकारे चुकीचे आहे.’
कंगनाने सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विटला सडेतोड उत्तर लिहिले, ‘स्विमसूटमधील फोटो पाहून तुम्ही इतके स्वस्त कसे काय म्हणू शकता, राजकारणात माझे स्थान बनवण्यासाठी मी हे सर्व केले आहे असे कसे म्हणू शकता. शरीर दाखवण्याशिवाय दुसरे काही नाही असे कसे म्हणता. मी एक कलाकार आहे, हिंदी चित्रपटांमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. माझ्या जागी एखादा तरुण असता तर राजकारणात येण्यासाठी कदाचित तो शरीर विकतोय असे तुम्ही म्हणाल का?’ असा प्रश्न तिने स्वामींना विचारला आहे.
कंगनाचा ‘तेजस’ हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्री भारतीय वायुसेनेच्या पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात ती तेजस गिलची भूमिका साकारत आहे. ‘तेजस’नंतर कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’मध्ये दिसणार आहे.