Baba Venga : बल्गेरियातील बाबा वंगा (Baba Vanga) यांनी केलेली भविष्यवाणी ही आजपर्यंत खरी ठरली असल्याचे सर्वानी पहिली आहे. दरवर्षी बाबा वंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असते. वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वंगा यांची दृष्टी गेलेली. पण तरिही त्यांनी केलेली भविष्यवाणी जगाची दिशा ठरवते असा समज आहे. बाबा वंगा यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेवर 9/11 चा दहशतवादी हल्ला आणि ब्रिटनमधील ब्रेग्झिटची भविष्यवाणी केली होती. त्यांच्यामार्फत करण्यात आलेली 2024 ची भविष्यवाणी ही आता जगासमोर आली आहे. पुढच्या वर्षीचे बाबा वंगाने केलेली भविष्यवाणी अत्यंत भयावह आहे.
बाबा वंगा यांची 2024 वर्षासाठी केलेली भविष्यवाणी ही खास करून रशियाची अत्यंत धक्कादायक असल्याचे दिसून येत आहे. कारण या भविष्यवाणीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. बाबा वंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, नव्या वर्षात पुतिन यांची हत्या केली जाऊ शकते. रशियातीलच कोणीतरी त्यांची हत्या करेल, असा अंदाज बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे. क्रेमलिन यांच्या वतीने सातत्याने पुतीन यांना कॅन्सर झाल्याचे वृत्त फेटाळून लावले जात आहे. तसेच, पुतिन यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
बाबा वंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत जगात दहशतवाद फोफावणार असल्याचेही सांगितले आहे. तसेच, युरोपला दहशतवादाचा मोठा फटका बसणार असून पुढच्या वर्षी एक मोठा देश जैविक शस्त्रांची चाचणी घेईल किंवा जैविक शस्त्रांचा वापर करुन हल्ला करेल. तसेच, दहशतवादी युरोपवर निशाणा साधणार असून युरोपातील विविध शहरांमध्ये ते हल्ले करतील, असा दावाही बाबा वंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत व्यक्त केला आहे.
बाबा वंगा यांनी आणखी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते, असा मोठा दावा बाबा वंगा यांनी आपल्या भविष्यवाणीतून केला आहे. कर्जाची पातळी, भू-राजकीय तणाव आणि आर्थिक शक्तींचं पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतर ही अशी कारणं आहेत, ज्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडू शकते, असे बाबा वंगा यांचे म्हणणे आहे.
बाबा वंगा यांनी पुढल्या वर्षी नैसर्गिक आपत्ती आणि खराब हवामानाचे विपरीत परिणाम पाहायला मिळतील असेही भाकीत वर्तवले आहे. वंगाच्या मते, पृथ्वीच्या कक्षेत बदल होणार आहे. हे फार कमी कालावधीसाठी होईल, परंतु त्यामुळे हवामान बदलाचे भयानक परिणाम दिसून येतील. तसेच, रेडिएशनचाही धोका पृथ्वीला असेल.
बाबा वंगा यांनी आपल्या भविष्यवाणीतून जगाला सायबर हल्ल्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. अडव्हान्स हॅकर्स पॉवर ग्रीड्स आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट्ससारख्या गंभीर पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील, असं बाबा वंगा यांनी म्हटलं आहे. यामुळे राष्ट्रीय स्तरावर सुरक्षेला धोका निर्माण होईल, असा अंदाज बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे.
बाबा वंगा यांच्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातून चांगली बातमी येऊ शकते. अल्झायमरसह कॅन्सरसारख्या आजारांवर नवे उपचार उपलब्ध होणार आहेत. 2024 मध्ये कॅन्सरवर उपचार करणं शक्य होईल, असा अंदाजही बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे. पुढील वर्षी क्वांटम कंप्युटिंगमध्ये मोठा शोध लागेल असा अंदाज बाबा वंगा यांनी वर्तवला आहे. क्वांटम कंप्युटिंग वेगानं विकसित होत आहे. याद्वारे सामान्य कंप्युटर वापरण्यापेक्षा जलदगतीनं समस्या सोडवता येऊ शकतात, असं वंगा यांनी सांगितलं आहे, असं झाल्यास पुढील वर्षी AI चा वापर वाढेल.