Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची गाणी नेहमीच चर्चेत राहिली आहेत. अनेकदा अमृता फडणवीस यांना त्यांच्या गाण्यामुळे ट्रोलही केले जाते. मात्र आता देवेंद्र फडणवीस हे गाणं गात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमाता देवेंद्र फडवीस आणि मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) ‘श्रीवल्ली’ या हिट गाण्यातील काही ओळी गायल्याचे पाहायला मिळाले.
नागपूरमधील उद्योजक प्यारे खान यांच्या मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन होते. त्या कार्यक्रमासाठी गायक जावेद अली (Javed Ali) सुद्धा हजर होता. या कार्यक्रमात जावेद अली हे गाणं गात असताना तिथे उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले आणि त्यांच्यासमोर त्यांनी माइक धरला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याबरोबर ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या दोन ओळी गायल्या. देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांनी या कार्यक्रम “तुझसे नाराज नहीं” हे गाणं गायलं. यावेळी उपस्थितींनी देखील टाळ्या वाजून दोघांनाही दाद दिली. दरम्यान, 2021 साली प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने मोठी कमाई केली होती. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ आणि ‘सामे सामे’ ह्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.