ICC ODI World Cup 2023 India vs South Africa : विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 37 व्या सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. हा सामना या विश्वचषकातील सर्वात मनोरंजक सामना ठरू शकतो, असे बोलले जात आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्मात आहेत.
भारताने आतापर्यंतचे सातही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार असून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.
कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.भारताने प्लेइंग-11 मध्ये एकही बदल केला नाही. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीच्या जागी फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीचा संघात समावेश केला.
IND vs SA Live: दोन्ही संघांचे Playing 11 खालीलप्रमाणे :-
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
विश्वचषकात दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने दोन वेळा तर दक्षिण आफ्रिकेने तीन सामने जिंकले आहेत.