एका दिवसात 51जण करोना बाधित
शिरूर (पुणे) – शिरूर तालुक्यातील 14 गावांत 51 करोनाबाधित रुग्ण आढळले. तालुक्यात गुरुवारी (दि. 3) पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.
वाघाळे, रांजणगाव गणपती, जांबूत, टाकळी हाजी, आलेगाव पागा व सणसवाडीतील हे करोनाबाळी आहेत. रांजणगाव गणपती, कोरेगाव-भीमा, शिक्रापूर, शिरूर ग्रामीण, सणसवाडी, शिरूर शहर ही गावे करोना संसर्गाची हॉटस्पॉट बनली आहेत. शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती 9, कोरेगाव-भीमा 7, शिक्रापूर 10, शिरूर ग्रामीण 5, आलेगाव पागा 1, भांबर्डे 1, कुरूळी 3, मांडवगण फराटा 1, निमोणे 1, पारोडी 1, बाभुळसर खुर्द 2, धामारी 1, करंजावणे 1, शिरूर शहर 8 असे शिरूर तालुक्यातील 14 गावांत 51 करोनाबाधित रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान शिरूर शहरातील राम आळी येथील 15 वर्षीय तरुण, रेव्हेन्यु कॉलनी येथील 25 वर्षीय तरुण, लाटे आळी येथील 65 वर्षीय महिला, गणेश नगर येथील 36 वर्षीय पुरुष, बोराडे मळा येथील 14 वर्षीय तरुण, तर शिरूर ग्रामीण रुग्णालयातील तिल 31 वर्षीय पुरुष, तर शिरूर शहरातील एक 45 वर्षीय महिला असे 7 जण कोरोना बाधित आढळले आहे.