एच. एस. प्रणोयचे आव्हान संपुष्टात
टोकियो – भारताच्या आव्हानाची धुरा सांभाळत पी.व्ही.सिंधू व बी. साईप्रणीत यांनी जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल केली. मात्र, भारताच्या एच.एस.प्रणोयचे आव्हान संपुष्टात आले.
साईप्रणीतने स्थानिक खेळाडू कानोता त्सुनेयामा याच्यावर 21-13, 21-16 असा विजय मिळविला. त्याने स्मॅशिंगच्या बहारदार फटक्यांचा उपयोग करीत सरळ दोन गेम्समध्ये ही लढत जिंकली. त्याचा सहकारी प्रणोय याला डेन्मार्कच्या रासमुस गेमके याच्याकडून 9-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला.
दोन गेम्समध्ये प्रणोय याला परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. तसेच त्याने प्लेसिंग करतानाही अक्षम्य चुका केल्या. त्याचाही फायदा गेमके याला झाला. साईप्रणीतला पुढच्या फेरीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तो याच्याशी खेळावे लागणार आहे.