आपल्या काळातील महान क्रिकेटपटूंमध्ये सामील असलेल्या सौरव गांगुलीच्या बायोपिकची अनेकदा चर्चा होते. अशात आता चर्चा आहे की आयुष्मान खुराना मोठ्या पडद्यावर ‘सौरव गांगुली’ बनू शकतो. भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर बनत असलेल्या या चित्रपटासाठी निर्मात्यांनी त्याला कास्ट केल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ‘दादा’ या बायोपिकसाठी रणबीर कपूरच्या नावाची चर्चा होती. यासोबतच रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असल्याची आणखी एक बातमी समोर येत आहे.
‘लव फिल्म्स’ त्याची निर्मिती करत आहे आणि आयुष्मान खुराना या चित्रपटासाठी काही काळापासून चर्चेत आहे. ‘मेकर्स अनेक महिन्यांपासून आयुष्मानसोबत या चित्रपटाची चर्चा करत आहेत. सौरव गांगुलीच्या भूमिकेसाठी डावखुरा फलंदाज असलेला आयुष्मान हाच सर्वोत्तम पर्याय असल्याची त्याला खात्री आहे.
‘सौरव गांगुलीने आयुष्मानच्या बायोपिकसाठी कास्टिंगला मान्यता दिली आहे आणि लवकरच त्याला वैयक्तिकरित्या भेटणार आहे. शूटिंग सुरू करण्यापूर्वी आयुष्मानला क्रिकेटचे प्रशिक्षणही घ्यावे लागेल. आयुष्मान खुराना आणि ऐश्वर्याचे काही चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. आयुष्मान लवकरच अनन्या पांडे, परेश रावल, अन्नू कपूर, राजपाल यादव, मनोज जोशी, असरानी, अभिषेक बॅनर्जी, सीमा पाहवा आणि मनजोत सिंग यांच्यासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये दिसणार आहे.