आयुष्मान खुरानाने आपल्या नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. आनंद एल. राय यांच्याबरोबर मिळून तो एक धमाल सिनेमा करणार आहे. त्याच्या या सिनेमाचे नाव “ऍक्शन हिरो’ असणार आहे. नावावरूनच हा एक ऍक्शन मुव्ही असणार आहे याची कल्पना येऊ शकते. आयुष्मानने या सिनेमाचा टीजर देखील रिलीज केला आहे.
आयुष्मानने जो टीजर रिलीज केला आहे, त्यात बॅकग्राऊंडला आयुष्मानचा आवाज ऐकू येतो आहे. यात तो म्हणतो, “हिरो होतो म्हणून दोन आयुष्ये जगत होतो. एक पडद्यावर आणि दुसरे पडद्यामागे. रोमॅंटिक हिरो असतो तर नाचगाणे करून वेळ मारून नेली असती. मात्र, ऍक्शन हिरोला ऍक्शन करायला लागते.
मात्र मला मारामारी करता येत नाही. मारामारीची ऍक्टिंग करावी लागते.’ असे तो या टीजरमध्ये म्हणताना ऐकू येत आहे. त्याच्या शेवटच्या वाक्यात मारामारीची ऍक्टिंग येते, असे म्हटल्यामुळे या सिनेमाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. आयुष्मानने आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे केले आहेत. मात्र, त्याने ऍक्शन हिरोचे काम केलेले नाही. हा एक विडंबनात्मक मुव्ही असणार आहे. अजून आयुष्मानने या सिनेमाबद्दल बाकीचा तपशील दिलेला नाही.