वाहतूक पोलीस-सिटी ग्लाइड ऑटोतर्फे सुविधा : 9859198591वर फोन करून रिक्षा “बुक’ करा
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक बंद केली आहे. परंतु या कालावधीमध्ये नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठी वाहनाची गरज पडल्यास, आता रिक्षा उपलब्ध होणार आहेत. वाहतूक पोलीस आणि सिटी ग्लाइड ऑटोच्या वतीने आता नागरिकांना रिक्षा उपलब्ध होणार आहे.
अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना प्रवास करण्याची गरज भासल्यास कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ही सेवा देण्यात येणार आहे. येत्या काळात नागरिक 9859198591 या क्रमांकावर फोन करून रिक्षा ‘बुक’ करू शकणार आहेत. सुरक्षेसाठी खबरदारी या सेवेअंतर्गत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या रिक्षांचे प्रत्येक फेरीनंतर स्वछता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
आवश्यक सेवांवेळी नागरिकांची सोय व्हावी, असा मुख्य हेतू आहे. सुरुवातीला 50 रिक्षा उपलब्ध होत होत्या. मात्र येत्या काळात सुमारे 100 वर रिक्षा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.