सिडनी : आॅस्ट्रेलिया न्यूझीलंडदरम्यानच्या मालिकेतील तिस-या कसोटीत आॅस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ३ बाद २८३ धावा केल्या. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.
स्टिव्ह स्मिथने काल फलंदाजी करताना पहिली धाव घेण्यासाठी चक्क ४५ मिनिटे व ३९ चेंडू लावले. त्याने नेल वॅगनरच्या चेंडूवर पहिली धाव घेतली, तेव्हा वॅगनरनेही त्याची पाठ थोपटली.
— ICC (@ICC) January 3, 2020
यासह स्मिथने आॅस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू डेव्हिड बूनच्या कामगिरीशी बरोबरी केली. बूननेही १९९१ साली एका सामन्यात असेच ३९ चेंडू खेळल्यानंतर पहिली धाव घेतली होती. पहिली धाव घेण्यासाठी सर्वात जास्त चेंडू खेळण्याबाबत स्मिथ दुसरा फलंदाज ठरला. या कसोटीतील पहिल्या डावात स्टिव्ह स्मिथने ६३ धावांची खेळी केली.
Colin de Grandhomme picks up his second as Steve Smith is caught by Ross Taylor at first slip.
The Australian batsman falls for 63.#AUSvNZ pic.twitter.com/NRWnIwp7Hp
— ICC (@ICC) January 3, 2020
यापूर्वी १९६३ मध्ये इंग्लंडच्या जाॅन मरे याने अॅशेस मालिकेतील सामन्यात ७९ चेंडू खेळल्यानंतर पहिली डाव घेतली होती.