नवी दिल्ली – राजधानीतील एका महिला क्रिकेटपटूने आपला प्रशिक्षक वारंवार विनयभंग करतो, तसेच बलात्कार करण्याचाही त्याने प्रयत्न केला होता. माझी कारकीर्द संपविण्याची धमकी देत त्याने मला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, असे या महिला क्रिकेटपटूने एका संदेशात सांगितले असून त्यासाठी मला मदत करा, अशी विनवणी तिने माजी कसोटीपटू व खासदार गौतम गंभीरकडे केली आहे.
प्रशिक्षकाला मी विरोध केला तर तो मला माझी कारकीर्द संपवण्याची धमकी देतो. या प्रशिक्षकाचे संघ निवड समितीतील सदस्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते मला कायम धमकी देतात, कृपया मला मदत करा, असे या महिला क्रिकेटपटूने गंभीरला टॅग केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.