अॅडलेड – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी दुसऱ्या दिवसांचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या 6 षटकांत 1 बाद 9 धावा झाल्या असून भारताकडे एकूण 62 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवसअखेर मयंक अग्रवाल 5 तर नाइट वाॅचमन जसप्रीत बुमराह शून्यावर खेळत आहे. पृथ्वी शाॅ दुसऱ्या डावातही फेल ठरला. त्याला 4 धावांवर कमिन्सने त्रिफळाचित केले.
तत्पूर्वी, फिरकीपटू आर आश्विन आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव , जसप्रित बुमराह यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 191 वर रोखले आणि 53 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली .
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात फलंदाजीत टीम पेनने सर्वाधिक 73 (नाबाद) तर मार्नस लाबुशेनने 47 धावा केल्या. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजांचा भारतीय गोलंदाजा समोर निभाव लागला नाही. भारताकडून पहिल्या डावात गोलंदाजीत आश्विनने सर्वाधिक 4, उमेश यादवने 3 तर जसप्रित बुमराहने 2 गडी बाद केले.
भारत पहिल्या दिवसअखेर 6 बाद 233
तत्पूर्वी, कालच्या 6 बाद 233 वरून पुढे खेळताना भारताला कालच्या धावसंख्येत केवळ 10 धावांची भर घालता आली आणि भारताचा पहिला डाव 244 वर आटोपला. भारताकडून फलंदाजीत विराट कोहलीने सर्वाधिक 74, पूजाराने 43 तर राहणेने 42 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मिशेल स्टार्कने सर्वाधिक 4, कमिन्सने 3 तर नाथन लायन आणि हेझलवूडने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – #india भारत दुसरा डाव – 1 बाद 9 (6 षटक).( पृथ्वी शाॅ 4, मयंक अग्रवाल खेळत आहे 5, जसप्रित बुमराह खेळत आहे 0, कमिन्स 1/06(3) ). #Australia ऑस्ट्रेलिया पहिला डाव सर्वबाद 191(72.1) – टी. पेन 73*(99), मार्नस लाबुशेन 47(119); आर आश्विन 4/55(18), उमेश यादव 3/40(16.1), जसप्रित बुमराह 2/52(21) आणि #India : भारत पहिला डाव : सर्वबाद 244(93.1) – विराट कोहली 74(180), चेतेश्वर पूजारा 43(160), अंजिक्य रहाणे 42(92) ; मिशेल स्टार्क 4/53(21), पी.कमिन्स 3/48(21.1), नाथन लायन 1/68(21), हेझलवूड 1/47(20)