मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत निक किर्गियॉसने तर, महिला एकेरीत आर्यना सबालेंका यांनी आपापले सामने जिंकत आगेकूच केली.
पुरुष एकेरीत निक क्र्गियॉसने लियाम बोर्डी याच्यावर 6-4, 6-4, 6-3 असा सरळ तिन सेटमध्ये विजय मिळवला. अन्य सामन्यात कामिल मचार्जकने आंद्रेयास सेप्पीचा 6-1, 6-1, 7-5 असा पराभव केला.
महिला एकेरीत सबालेंकाने स्ट्रॉम सेंडर्सवर 5-7, 6-3, 6-2 अशी मात केली. पहिला सेट गमावल्यावरही सबालेंकाने थाटात पुनरागमन करत नंतरचे दोन सेट सलग जिंकत स्पर्धेत दुसरी फेरी गाठली.
अन्य सामन्यात मारिया बुझकोव्हाने रिबेका मरिनोवर 6-1, 6-3 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. वॅंग इनुने अन ली हीचा 7-6, 6-3 असा पराभव केला. तमारा झीदानसेकने अरांता रशचा 3-6, 6-3, 7-6 असा पराभव केला.