मेलबर्न – मोसमातील पहिल्याच ऑस्ट्रेलियन (2024 Australian Open) ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत बेलारूसच्या आर्यना सबालेन्काने थाटात पहिल्या फेरीत विजयाची नोंद केली. तिने (Aryna Sabalenka)पहिल्या फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या इला सीडलचा (Ella Seidel) 6-0,6-1 असा पराभव केला.
महिला एकेरीच्या अन्य लढतीत डेन्मार्कच्या कॅरोलिन वाझीयंकीने पोलंडच्या मेग्दा लिनेटवर पहिल्या सेटमध्ये 6-2 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरा सेट सुरु झाल्यावर मेग्दाने दुखापतीने सा सामना सोडला व वाझीयांकीला पुढे चाल दिली. त्यावेळी वाझीयांकी या सेटमध्ये 2-0 अशी आघाडीवर होती.
फ्रान्सच्या डायना पेरीने चीनच्या वांग झींग यु हीच्यावर6-3, 2-6, 6-3 अशी मात केली. पुरुष एकेरीत फ्रान्सच्या अलेक्झांड्रे मुल्लरने आपलाच देश सहकारी हुगो ग्रेनियरचा पराभव केला. फ्रान्सच्या गेल मॉन्फील्सने जर्मनीच्या यान्नीक हान्फमनवर 6-4, 6-3, 7-5 असा विजय मिळवला.
अर्जेटिनाच्या फ्रान्सिस्को सेरुंडोलोलाही पाच सेटपर्यंत लढा द्यावा लागला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेन स्वीनीचा 3-6, 6-3, 6-4, 2-6, 6-2 असा पराभव केला. यानिक सिन्नेरने नेदरलँड्सच्या बोटिक व्हॅन डे झँडशूल्पला 6-4, 7-5, 6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. अमेरिकेच्या फ्रिट्झने अर्जेटिनाच्या फाकुंडो डियाझ अकोस्टाला 4-6, 6-3, 3-6, 6-2, 6-4 असे पराभूत केले.