प्रेयसीच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न फसला

प्रेमसंबंधातून प्रकार : शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

सविंदणे  – मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडीमधील विवाहित प्रेयसीच्या प्रेमसंबंधात बाधा येत असल्याच्या कारणावरून प्रियकराने प्रेयसीच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधानामुळे हल्लेखोरांचा प्रयत्न निष्पळ ठरला.

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना मुंबई, आंबळे येथून अटक केली आहे. तीन आरोप बालगुन्हेगार आहेत. तीन आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी शिवाजी बिचुकले, अजय कुलाळ, अनिकेत गोरडे, असे अटकेतील आरोपींचे नावे आहेत. फिर्यादी युवक संजय भिवा शिंदे यांच्या पत्नीचे व आरोपी शिवाजी जानकु बिचुकले यांच्यात प्रेमसंबध होते.

या प्रेमसंबंधांची फिर्यादीस कुणकुण लागली होती. फिर्यादीचे चेंबूरमधील घर रेल्वे अतिक्रमणात गेल्याने ते तीन महिन्यांपासून शिदेंवाडी येथे पत्नीसह येवून रहात होते. प्रेमसंबंधात बाधा निर्माण होत असल्यामुळे आरोपी शिवाजी बिचुकले हा संतापला होता. त्याने त्याचा भाचा व त्याच्या मित्रांच्या साथीने प्रेयसीच्या पतीला पळवून नेवून खून करण्याची योजना आखली. फिर्यादीची कार चार हजार रुपयांस भाड्याने घेऊन भीमाशंकरला जाण्यासाठी ठरवली. पहाटेच्या सुमारास फिर्यादी ड्रायव्हर गाडी घेऊन निघाले.

चार आरोपी कारमध्ये तर दोघेजण आरोपी पल्सर मोटारसायकलवर कारच्या पाठीमागे माळशेज घाट, भीमाशंकर येथे फिरले. परतीचा प्रवासात आरोपींनी फिर्यादी ड्रायव्हरला लघुशंकेकरिता कार उभी करण्यास सांगितली. आरोपींनी फिर्यादीस गळ्यात रस्सी टाकून गळा आवळण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्यांच्याशी झटापट करून कारमधून पळून तेथील जवळच्या घरात जावून लपून बसला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. पोलिसांनी ऐवज जप्त केली आहे. तपास पोलीस निरीक्षक नारायण सांरगकर व पोलीस नाईक मुकुंद कुडेकर करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)