गर्दीत लुटणाऱ्यास शिताफीने पकडले

वाघोली – वाघेश्‍वर मंदिरामध्ये लहान बाळाच्या गळ्यातील सोन्याचे बदाम चोरून पळणाऱ्या चोरट्यास गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे चोरीला गेलेली गाडी पोलिसांना मिळाली आहे. राहुल बाबू जाधव (रा. शरदनगर झोपडपट्टी, निगडी), असे पकडलेल्याचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सुरेशकुमार राऊत (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे यांनी त्यास अटक केले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, ऋषीकेश व्यवहारे, प्रतीक्षा पानसरे, किर्ती नरवडे, इप्पर, सुकळे यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)