अखेर शाळेची इमारत बांधण्यास तात्पुरती जागा

नीरेतील आक्रमक पालकांच्या शाळा बंद आंदोलनाला यश 

नीरा  – नीरा (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तात्पुरत्या शेडसाठी रयत शिक्षण संस्थेने नीरा येथील संकुलात जागा उपलब्ध करून दिल्याने तात्पुरता शेडचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. त्यामुळे पालकांच्या आंदोलनाला यश आले आहे.

येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस आल्याने सहाशे विद्यार्थ्यांना रयत संकुलातत बसवण्यात येत होते. मात्र, या ठिकाणी अपुरी जागा, आदी कारणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांनी आंदोलन सुरू केले होते.

रयतच्या सचिवांकडून रयत संकुलात दहा वर्ग खोल्या बांधण्यासाठी परवानगी देत असल्याचे पत्र जिल्हा परिषदेच्या यांच्या नावे दिले आहे. हा प्रश्‍न मार्गी लागला आहे, असे व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष गणेश जाधल यांनी सांगितले.

पालकांचे आंदोलन व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहून रयत शिक्षण संस्थेने एक चांगला निर्णय घेतला आहे. याप्रकरणी संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता येथील नवीन वर्गखोल्या बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

-विराज काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)