पिंपरी – म्हाळुंगे येथील अॅक्सिस बँकेचे एटीएम पळविण्याचा चोरट्याने प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. १२) पहाटे घडली.
महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. बुधवारी पहाटे चोरट्यांनी येथील एटीएम पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणाची तरी चाहूल लागल्याने चोरटे एटीएम जागेवरच टाकून पळून गेले. त्याबाबत म्हाळुंगे पोलीस अधिक तपास करीत आहेत.