पुणे – महिलेचा विनयभंग करुन तीच्या गळ्यावर पाय देत खूनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना कात्रज येथील संतोषनगर येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात असिफ अब्दुल रेहमान शिकीलकर(52) व अमिन असिफ शिकीलकर ( 21,रा.संतोषनगर, कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 40 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
फिर्यादी महिला व आरोपी असिफ यांच्या मुलांचा किरकोळ अपघात झाला होता. या अपघाताचा राग आरोपी असिफच्या मनात होता. यामुळे आरोपीने बघुन घेतो अशी धमकी दिली होती. त्याला समजावण्यासाठी फिर्यादी पतीसह आरोपी असिफच्या घरी गेल्या होत्या.
यावेळी आरोपीने त्यांना लाथा बुक्क्याने मारहाण करुन त्यांचा विनयभंग केला. त्या जमिनीवर पडल्या असताना आरोपीने त्यांना धरुन त्यांच्या मानेवर पाय देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.