नवी दिल्ली – दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या 23 वर्षीय सागर राणा हत्या प्रकरणानंतर फरार असलेला ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यामुळे सुशील कुमार भवती कायद्याचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे.
फरार असलेल्या सुशील कुमारला शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांची छापेमारी सुरू आहे. पोलिसांनी आरोपींचा पत्ता सांगणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे. त्यातच मारहाण झालेल्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सींक सायन्स लॅबने योग्य असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये सुशील कुमार आपल्या साथीदारांसह सागर ऱाणा याला मारताना दिसत आहे.
सुशील कुमारविरुद्ध हा ठोस पुरावा मानला जात आहे.छत्रसाल स्टेडियममधील हे सीसीटीव्ही फुटेज असून यामध्ये सुशील कुमार आपल्या २० ते २५ साथीदारांसह सागर राणा आणि दोन व्यक्तींना मारताना दिसत आहेत. फॉरेन्सींक सायन्स लॅबने हा पुरावा योग्य असल्याचं म्हटलं आहे.
Sushil Kumar was seen at Meerut toll plaza: Delhi Police
Read @ANI Story | https://t.co/yOUydnODuI pic.twitter.com/PhtasLESaV
— ANI Digital (@ani_digital) May 20, 2021
दरम्यान फरार असलेल्या सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर एक लाखांच्या इनामाची घोषणा केली होती. तर त्याचा साथीदार अजयविषयी माहिती देणाऱ्यांना 50 हजारांचे इनाम मिळणार आहे.