पाथर्डी, दि. 9 (प्रतिनिधी) -पाथर्डी तालुक्यात बिबट्यांचे हल्ले थांबता थांबेनात. आतापर्यंत तालुक्यातील तिघांचा बळी बिबट्याने घेतला आहे. वनविभागाने चार बिबटे जेरबंद केले आहेत. मात्र तरीही हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. आज तालुक्यातील मिडसांगवी येथे शेतातील विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या तानिया दिलावर शेख या सोळा वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला. मात्र तिने गळ्याला मफलर व ओढणी गुंडाळली असल्याने ती या हल्ल्यातून बालंबाल बचावली.
नगर/जामखेड : मोठी बातमी! 11 जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश
दुसऱ्या घटनेत बिबट्या आपल्याकडे येत असल्याचे पाहून एका मुलाने विहिरीत उडी घेतली. त्यामुळे बिबट्या तेथून निघून गेला. याबाबत अधिक माहिती अशी की, मिडसांगवी येथील तानिया शेख ही सोळा वर्षांची मुलगी आज सकाळी सात वाजता शेतातील विहिरीवर विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेली होती. यावेळी शेतातच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. यावेळी बिबट्याने तिची मान जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र तानियाने गळ्याभोवती मफलर व ओढणी गुंडाळली असल्याने हे कपडे त्याच्या तोंडात आले. तानियाने आरडाओरड केल्याने तिचे नातेवाईक तिच्या मदतीला धावले. त्यामुळे बिबट्या तेथून पळून गेला. तानियाच्या हातावर जखमा झाल्या आहेत. खरवंडी येथे खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
राहुरी : गोठ्यातील गायींना वाचवण्यासाठी शेतकऱ्याची बिबट्याशी झुंज; तालुक्यातील चिखलठाण येथील घटना
दुसऱ्या घटनेत तांबेवाडी (टाकळीमानूर) येथील गणेश सुदाम महानवर (वय 16) हा शेतात दारे धरण्यासाठी गेला असता, अचानक एक बिबट्या त्याच्या समोर आला. तो आपल्याकडे येत आहे, हे लक्षात आल्यावर गणेशने जवळ असलेल्या विहिरीत उडी घेतली. त्यानंतर परिसरातील लोक त्याच्या मदतीला धावले.
ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. पिंपळगाव टप्पा येथील शंकर धोंडिबा शिरसाट यांच्या घरासमोर बांधलेल्या म्हशीवर बिबट्याने दोन दिवसांपूर्वी सायंकाळी हल्ला केला होता. त्यात म्हैस ठार झाली. यावेळी शिरसाट व त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या तेथून निघून गेला.
कर्जत : नरभक्षक बिबट्याची वनविभागाकडून शोध मोहीम
त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, मनीषा ढाकणे यांनी शिरसाट कुटुंबाची भेट घेत घटनेची माहिती घेतली होती. 8 डिसेंबरला देखील टाकळी मानूर येथील नूर मोहम्मद शेख यांच्या घरासमोर बांधलेल्या म्हशीवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तो फसला.