नगर/जामखेड (प्रतिनिधी) – नगरसह सोलापूर, औरंबागाबद, बीड या चार जिल्ह्यांत नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे ( leopard attack ) . या बिबट्याने आतापर्यंत 11 जणांचा( leopard attack kills 11 ) बळी घेतला आहे, तर तिघांना गंभीर जखमी केले आहे.
त्यानंतर प्रशासनाला जाग आली असून, नरभक्षक बिबट्याला बेशुद्ध करुन पकडणे शक्य नसल्यास गोळ्या घालून ठार करण्याची परवानगी दिली आहे. राज्याचे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी वनविभागाला तसे आदेश दिले असून, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
करमाळा : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महीलेचे शीर धडापासून वेगळे
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे सोमवारी सकाळी नरभक्षक बिबट्याने राजेंद्र बारकुंड यांच्या शेतातील उसाच्या फडात ऊसतोड करण्यासाठी आलेल्या कामगाराच्या मुलीचा बळी घेतला. तिला गंभीर जखमी अवस्थेत करमाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचार सुरू असताना मुलीचा मृत्यू झाला. फुलाबाई हरिचंद कोठले, असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
पुणे जिल्हा: बिबट्या करतोय दुचाकींचा पाठलाग
आतापर्यंत अलका बडे (रा. जाटवाद, ता. शिरुर), शिलावती दिंडे (रा. मंगळूर, ता. आष्टी) व शीलाबाई भोसले (रा. पारगाव, ता. आष्टी) या बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत, तर अशोक आवटे, कृष्णा आवटे, छबूबाई राठोड, नागनाथ गर्जे, स्वराज भापकर, सुरेखा भोसले, कल्याण फुंदे, जयश्री शिंदे व फुलाबाई हरिचंद कोठले यांचा बिबट्याने बळी घेतला आहे.
हा नरभक्षक बिबट्या घातक ठरू लागल्याने करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी बिबट्याला ठार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वन विभागाकडे केली आहे. तसेच माजी आमदार नारायण पाटील यांनी वनमंत्र्यांनाच फोन केला होता. त्यानंतर रविवारी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी त्या बिबट्याला पिंजरा लावून तथा बेशुद्ध करुन पकडणे शक्य नसल्यास गोळ्या घालून ठार करण्याची परवानगी दिली आहे.
“मंत्री साहेब, रात्रीतरी पूर्ण दाबाने वीज द्या” – बिबट्याच्या वावराने भयभीत शेतकऱ्यांची मागणी
बिबट्याला ठार करण्यासाठी पुणे व औरंगाबाद प्रादेशिक वन विभागीय कार्यालयाने प्राधिकृत केलेले वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी तथा अन्य व्यक्तींनाच परवानगी असेल, असे काकोडकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नरभक्षक बिबट्याने शेतकरी व शेतमजुरांसह ऊसतोड कामगारांना शेतात जाणे मुश्किल केले आहे. झाडाआड प्रसंगी झाडावर लपून बसलेला बिबट्या अनेकांना दिसला. तत्पूर्वी, शेतात कामानिमित्त गेल्यानंतर तथा कामावरुन घरी परतताना बिबट्याने हल्ले केले आहेत. परंतु, या नरभक्षक बिबट्याला अद्याप पकडण्यात वन विभागाला यश आलेले नाही.