नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 345 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 63 हजार 81 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.15 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्णसंख्येत 316 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1557 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 97, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 110 आणि अँटीजेन चाचणीत 109 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 24, अकोले 2, जामखेड 4, कोपरगाव 25, नगर ग्रामीण 5, नेवासा 6, पारनेर 2, पाथर्डी 10, राहुरी 2, संगमनेर 5, शेवगाव 4, श्रीगोंदा 5, कॅन्टोन्मेंट 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 39, अकोले 2, कर्जत 2, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 9, नेवासा 4, पारनेर 7, पाथर्डी 2, राहाता 11, राहुरी 6, संगमनेर 17, शेवगाव 1, श्रीगोंदा 1 आणि श्रीरामपूर 7 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 109 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 10, अकोले 5, कर्जत 5, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 6, नेवासा 5, पारनेर 5, पाथर्डी 14, राहाता 12, राहुरी 2, संगमनेर 21, शेवगाव 9, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 8 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 98, अकोले 16, जामखेड 5, कर्जत 13, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 17, नेवासा 21, पारनेर 20, पाथर्डी 16, राहाता 17, राहुरी 13, संगमनेर 60, शेवगाव 16, श्रीगोंदा 09, श्रीरामपूर 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.