गोठ्यातील गायींना वाचवण्यासाठी शेतकऱ्याची बिबट्याशी झुंज

राहुरी तालुक्‍यातील चिखलठाण येथील घटना

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्‍यातील चिखलठाण गावातील बुळेपठार येथे बिबट्याने हल्ला करून दोन व्यक्ती व तीन गायींना जखमी केल्याची घटना घडली. बिबट्याने केलेला हल्ला मच्छिंद्र दुधावडे, तावजी केदार यांनी परतवून लावला. त्यात ते जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.7) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. ( farmer fights leopard to save cow )

मोठी बातमी! 11 जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

याबाबत सविस्तर माहिती अशी, सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घरासमोर बांधलेल्या गायींवर बिबट्याने हल्ला केला. यावेळी गायींनी व उपस्थित असलेल्या महिलांनी आरडाओरडा केला. हा आवाज ऐकूण शाळेजवळ शेकोटी करुन बसलेले मच्छिंद्र दुधावडे हे घराकडे धावले. त्यांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात बिबट्या गायीवर हल्ला करीत असल्याचे पाहिले. ( farmer fights leopard to save cow )

पुणे जिल्हा: बिबट्या करतोय दुचाकींचा पाठलाग

त्यांनी आरडाओरडा करून बिबट्याला पिटाळून लावले. यावेळी बॅटरी घेवून बिबट्या कुठे दिसतो काय, हे पाहण्यासाठी गेलेल्या दुधवडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांनी हात पुढे करून छातीवर होणारा हल्ला हातावर घेतला. त्यांच्या हाताला बिबट्याने जोरदार चावा घेवून हात जबड्यात पकडून ठेवला. अशाही परिस्थितीमध्ये दुधावडे यांनी बिबट्याची मान एका हाताने दाबत जबड्यातील हात मोकळा करून घेतला. ( farmer fights leopard to save cow )

करमाळा : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महीलेचे शीर धडापासून वेगळे

संधी मिळताच ते घरात पळाले. दुधवडे यांचा आवाज आल्याने जवळ राहणारे तावजी केदार त्यांच्या मदतीला धावले. त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या पोटाला जखमा झाल्या. बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींवर डॉ. जालिंदर घिग यांनी प्रथमोपचार केले. जखमींच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे ग्रामीण रुग्णालयाद्वारे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.