कामशेत – दाजीने (बहिणीचा नवरा) मेव्हुणीवर कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केले. रविवारी (दि. 3) सकाळी सात वाजल्याच्या सुमारास चिखलसे येथे घडली आहे. या प्रकरणी विजया अरुण नवघणे (वय 36, रा. चिखलसे) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पद्मामकर लक्ष्मण सुतार (वय 45, रा. आढे ता. मावळ) याला कामशेत पोलिसांनी अटक केली आहे.
विजया नवघणे या त्यांच्या पतीसह चिखलसे येथून अहिरवडे येथे माळरानातील पायवाटेने पायी जात होत्या. विजया नवघणे यांचे पती अरुण नवघणे हे पुढे चालत गेले व त्यांचे पाठोपाठ चालत असताना समोरून आलेले विजया यांचे दाजी पद्माकर सुतार यांनी विजया यांना तुझ्यामुळे माझी बायको मुले मला सोडून गेली आहेत. तसेच माझे मोठ्या मुलीचे लग्न सुद्धा तुम्ही परस्पर लावून दिले.
मला लग्नाला बोलावले नाही, असे म्हणून विजया नवघणे यांना एका हाताने तोंडात मारून व दुसऱ्या हातात असलेल्या कुऱ्हाडीच्या दांडक्याने डोक्यात मारली. त्यावेळी विजया या खाली वाकून डोक्याला हात लावला. त्याने कुऱ्हाडीने विजया यांच्या उजव्या खांद्याच्या बाजुला वार केला. यावेळी विजया खाली पडल्या असता त्यांना हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. या प्रकरणी कामशेत पोलिसांनी पद्मामकर लक्ष्मण सुतार यास अटक केली आहेत.