लोणावळा – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम हे मांसाहारी होते असे वक्तव्य केले. यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्या प्रतिमेचे दहन केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या या निषेध सभेला माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, रामविलास खंडेलवाल, देविदास कडू, सुधीर पारिठे, आशिष बुटाला, हर्षल होगले, अर्जुन पाठारे, जयप्रकाश परदेशी, अश्विनी जगदाळे, योगिता कोकरे, श्रद्धा बेदरकर, अभय पारख, संतोष जंगले, बाबू संपत, शुभम मानकामे, अमित गंधे, प्रफुल्ल काकडे, संकेत निकुडे, राजू परदेशी, चारूलता कमलवार, परिजा भिलारे, हेमंत कांबळे, शैलेश कचरे, जगदीश सलोजा, मयूर जाणिरे, सिद्धेश अंभोरे, नंदू जोशी, पार्वती रावळ, दिनेश ओसवाल, रोहित कदम, वैभव कचरे, कुणाल सावंत, विकास खेंगरे, निता गायकवाड, भारती महाडिक, मुक्ता गव्हाणे, स्मिता भिलारे, रवी शेट्टी उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोलिसांनी योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड यांनी केली. निषेध आंदोलनाच्या दरम्यान उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले. त्यानंतर त्या प्रतिमेचे दहन करून भाजप कार्यकर्त्यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन पर्यंत आपला मोर्चा नेला. त्याठिकाणी पोलीस निरीक्षक सिताराम दुबल यांना निवेदन देत आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.