मुंबई- भाजपचे नेते नितेश राणे यांच्याविरोधात नवीन पनवेल पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्ह्याची नोंद झाली आहे. केंद्र सरकार सूचना व प्रसारण मंत्रालयाकडून प्रतिबंध लावलेले असतानाही आमदार राणे यांनी आपल्या भाषणात प्रतिबंधित असलेले शब्द वापरल्याने त्यांच्यावर वकीलांमार्फत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आता राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आमदार राणे यांनी प्रतिबंध करण्यात आलेल्या शब्द आपल्या भाषणात वापरल्याने वकीलांमार्फत त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवला गेला आहे. तसेच आमदारांचे भाषण प्रसिद्ध केल्याने, एका दूरचित्रवाहीनींवर व निवदेकावरही कारवाई करण्यात यावी, असेही या तक्रारीत म्हंटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल आमदार राणे यांनी केलेल्या भाषणांचा नमुना या तक्रारीत देण्यात आला आहे. या भाषणाचा दाखला वकील अमित कटारनवरे यांनी दाखल केला आहे. या भाषणातील वादग्रस्त माहिती कटावनवरे यांनी पनवेल येथील सत्र न्यायालयातील तक्रारीमध्ये मांडल्यानंतर न्यायाधिशांनी पोलिस विभागाला आदेश काढून सीपीआरपीसी 156 (3) कलमान्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.