राजगुरुनगर -मंदोशी (ता. खेड) येथे जुन्या भांडणाच्या कारणास्तव येथील दलितवस्तीमधील एका कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गावातीलच 8 जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अन्वये (ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे यांनी दिली.
खडूं मोतीराम मोहन, देवराम लक्ष्मण मोहन, रामदास गणपत मोहन, ज्ञानेश्वर सुरेश वाघमारे, दत्तात्रेय शांताराम मोहन, योगेश तानाजी मोहन, पप्पू खंडू मोहन, निलेश दत्तात्रय मोहन (सर्व रा. मंदोशी, ता खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नावे आहेत. तर विलास बाजीराव रोकडे (वय 26) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
आडगाव येथील सात जणांवर ऍट्रॉसिटी
दुसऱ्या जातीच्या मुलीबरोबर प्रेमविवाह केला म्हणून एका युवकाला व त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्याप्रकरणी आडगाव (ता. खेड) पत्नीच्या भावासह 7 जणांवर खेड पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली(ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल झाला आहे. ऋषिकेश विलास लोंढे, शरद ज्ञानेश्वर लोंढे, शिवाजी ज्ञानेश्वर लोंढे, पुनाजी शिवेकर, माउली कलवडे,विकास कलवडे, आकाश कलवडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. विशाल अशोक साबळे असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्यानेच फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे करीत आहेत.