नवी दिल्ली – डोपिंगमुळे भारतीय खेळाडूंचे खूप नुकसान झाले आहे. अनेक वेळा चाचणी दरम्यान पकडले गेलेले खेळाडू अनेकदा व्यायम करत असताना बनावट सप्लिमेंट व औषधांद्वारे प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केल्यामुळे चाचणीत दोषी ठरतात. त्यामुळे पॅरिसच्या पार्श्वभूमिवर काळजी घेताना खेळाडूंनी डोपिंगपासून दूर राहावे, असे आवाहन क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.
ठाकूर यांनी आभासी पद्धतीने गुजरातमधील गांधीनगर येथील नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी (एनएफएसयू) येथे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्पोर्ट्स सप्लिमेंट टेस्टिंगचे उद्घाटन केले.
ठाकूर पुढे म्हणाले, “जेव्हा आपण पॅरिसची महत्वाकांक्षा ठेवतो त्यावेळी खेळाडूंना एवढेच आवाहन करावे वाटते की, सुरक्षित खेळा, स्वच्छ खेळा व डोपिंग सारख्या गोष्टींपासून दूर राहा. यासाठी जनजागृती खूप महत्त्वाची आहे. जागरुकतेसोबतच खेळाडूंना योग्य सुविधाही दिल्या गेल्या पाहिजेत, असेही मत यावेळी त्यांनी मांडले.
Yashasvi Jaiswal : कोण आहे ‘यशस्वी जैस्वाल’ची गर्लफ्रेंड? सोशल मीडियावरील फोटोने एकच खळबळ…
तसेच, आतापर्यंत सप्लिमेंट्सची चाचणी घेण्याची सुविधा आपल्याकडे नव्हती. आता ती उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे जिममध्ये जर भेसळयुक्त सप्लिमेंट्स, शक्ती वाढवणारी औषधे असतील तर आता तेही याद्वारे तपासता येतील. खेळाडूंना त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी चांगल्या दर्जाचे सप्लिमेंट्स देखील मिळू शकतात, असेही त्यांनी यावेळी म्हटले.