Yashasvi Jaiswal : कोण आहे ‘यशस्वी जैस्वाल’ची गर्लफ्रेंड? सोशल मीडियावरील फोटोने एकच खळबळ…

Updated On:-9 फोटो
Photo 1
1 / 9

आणखी संबंधित फोटो

Yashasvi Jaiswal Girlfriend Maddie Hamilton : यशस्वी जैस्वालने विशाखापट्टणम कसोटीत 209 धावांची संस्मरणीय खेळी खेळली.  यासह हा युवा फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला. याच खेळीमुळे टीम इंडियाला ब्रिटीशांचा पराभव करण्यात यश आले. आयसीसी क्रमवारीत या खेळीचा यशस्वी जैस्वालला जबरदस्त फायदा झाला. भारतीय सलामीवीराने आयसीसी कसोटी क्रमवारीत 37 स्थानांनी झेप घेतली. आता यशस्वी जैस्वाल आयसीसी कसोटी क्रमवारीत 29व्या स्थानावर पोहोचला आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावातही जैस्वालने 80 धावांची खेळी केली होती. असे असले तरी इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीत द्विशतक झळकावणारा भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे.

जैस्वालने (Yashasvi Jaiswal) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 290 चेंडूत 209 धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीत द्विशतक झळकावणारा भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे.

यशस्वी आणि त्याची रूमर्ड (अफवा) गर्लफ्रेंड मॅडी हॅमिल्टन (Maddie Hamilton) यांची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

व्हॅलेंटाईन वीकमध्ये यशस्वी आणि हॅमिल्टन या दोघाची हीच छायाचित्रे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

यशस्वीने 6 जुलै 2022 रोजी सोशल मीडियावर मॅडीसोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि त्याने कॅप्शनमध्ये ‘फॅमिली’ असे लिहिले होते.

तेव्हापासून यशस्वी आणि मॅडीच्या अफेअरच्या बातम्यांनी जोर पकडला होता.

एप्रिल 2022 मध्ये, मॅडीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, तेव्हा यशस्वीने फायर इमोजीसह ‘हॉट’ अशी कमेंट केली होती.

मॅडी ही इंग्लंडची रहिवासी आहे, तिच्या आणि यशस्वीच्या अफेअरच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

अलीकडे इंग्लिश मुली सामन्यादरम्यान भारतीय जर्सी घालताना दिसल्या, त्यातील एक मॅडी होती. यशस्वी आणि मॅडी गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत आहेत.  मात्र दोघांपैकी कोणीही या अफवांना अधिकृतपणे पुष्टी दिलेली  किंवा नाकारलेली नाही, परंतु त्यांच्या मैत्रीची झलक आणि मॅडीने यशस्वी जैस्वालला दिलेला स्पष्ट पाठिंबा याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Jaiswal Ban Risk : यशस्वी जैस्वालवर बंदी? श्रीलंकेच्या गोलंदाजाशी पंगा घेतल्याने आयसीसीच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

Jaiswal Ban Risk : यशस्वी जैस्वालवर बंदी? श्रीलंकेच्या गोलंदाजाशी पंगा घेतल्याने आयसीसीच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

Jaiswal Fernando Fight : कोलंबो कसोटीत तुफान राडा! फर्नांडोने कोपर मारला अन् जैस्वालने थेट हेल्मेटने दिली टक्कर, पाहा VIDEO

Jaiswal Fernando Fight : कोलंबो कसोटीत तुफान राडा! फर्नांडोने कोपर मारला अन् जैस्वालने थेट हेल्मेटने दिली टक्कर, पाहा VIDEO

Jaiswal Sledging Dickwella : "हिंमत असेल तर मारून दाखव!"; जैस्वालच्या स्लेजिंगला डिकेवेला भुलला अन् गमावून बसला विकेट, पाहा VIDEO

Jaiswal Sledging Dickwella : "हिंमत असेल तर मारून दाखव!"; जैस्वालच्या स्लेजिंगला डिकेवेला भुलला अन् गमावून बसला विकेट, पाहा VIDEO

Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड; WTC मध्ये 'ही' कामगिरी करणारा ठरला तिसराच फलंदाज

Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड; WTC मध्ये 'ही' कामगिरी करणारा ठरला तिसराच फलंदाज