जळोची : अजित पवार म्हणतात ते बरोबरच आहे. चला त्यावेळी सगळा पक्ष एकच होता ना. सगळे एकत्रच होते. माझ्याकडे केंद्राच्या स्कीमची जबाबदारी होती. पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच लोकसभा मतदारसंघातील विविध आमदारांबरोबर एकत्रित काम केले. त्यामुळे ‘ताटातील वाटीत.. आणि वाटीतील ताटात’.. त्यामुळे सगळेच एकत्र मिळून काम करीत होतो, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
कन्हेरी येथील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या परिचय पुस्तिकेवरून तसेच पवार कुटुंबीयावर टीकास्त्र सोडले होते. त्यावर सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्हेरी येथील प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार यांच्यासह विविध ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी अमेरिकेतील मीडियाला पवार कुटुंब कसे एक आहे, हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, अशी टीका केली होती. यावर सुळे म्हणाल्या की, हे ‘हास्यास्पद’ आहे. न्यूयॉर्क टाइम्सचा माणूस साऊथीस्ट एशिया बघतो. तो बारामतीला येतो. इंटरव्यू घेतो. त्यात आमचा काय संबंध आहे. असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले.
भाजप सरकारने पदवविभूषण दिले
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अन्याय झाला, असा आरोप केला. या प्रश्नावर सुळे म्हणाल्या की, मला प्रांजळपणे त्यांना एवढीच आठवण करून द्यायची आहे की, शरद पवार यांनी गेल्या ५० वर्षात. महाराष्ट्रात आणि देशात जे काम केले. त्याबद्दल त्यांच्याच सरकारने शरद पवार यांना पदवविभूषण दिले आहे, अशी कोपरखळी त्यांनी केली.