चिंबळी -खेड तालुक्यातील माजगाव (चिंबळी) ते माजगाव फाटा या रस्त्याचे वीस वर्षांपूर्वी डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, म्हणून या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी माजगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती.
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे यांच्या फंडातून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते; परंतु 23 मार्चला संपूर्ण राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारच्या वतीने प्रतिबंधक उपाय म्हणून सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले असल्याने या रस्त्याचे काम रखडले होते.
गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा या रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात करून आता काम पूर्ण झाले असून येथे तीन ते चार ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.