Asia Cup 2023 Super-4 PAK vs SL : पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिजवानच्या नाबाद 86 धावांच्या जोरावर
42 षटकात 252 धावा केल्या आहेत. डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेसमोर विजयासाठी 253 धावांचे लक्ष्य आहे.
पाकिस्तानकडून फलंदाजीत मोहम्मद रिझवानने सर्वाधिक नाबाद 86 धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने 52 धावांची खेळी केली. इफ्तिखारने 47 धावांचे योगदान दिले. त्याने रिझवानसोबत शतकी भागीदारी करत सामन्यात पाकिस्तानचे दमदार पुनरागमन केले.
श्रीलंकेकडून गोलंदाजीत पाथिरानाने सर्वाधिक तीन आणि मदुशनने दोन गडी बाद केले. तिक्ष्णा आणि वेळलगे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दरम्यान, हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल आणि त्यांचा विजेतेपदासाठी भारताशी 17 सप्टेंबरला सामना होईल.