Live Score Cricket Today, India vs Bangladesh Asia Cup 2023 :आज आशिया चषक 2023 चा शेवटचा सुपर फोर सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे.
17 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी तयारी म्हणून टीम इंडिया हा सामना पाहणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 265 धावा केल्या आहेत.
भारताचा निम्मा संघ 139 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. सूर्यकुमार यादवच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला. त्याने 34 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. शाकिब अल हसनने त्याला क्लीन बोल्ड केले. आता शुभमन गिलसोबत रवींद्र जडेजा क्रीझवर आहे. गिलने अर्धशतक झळकावले असून तो 93*(111) धावांवर खेळत असून 36 षटकांनंतर भारताची धावसंख्या 5 बाद 163 झाली आहे. रविंद्र जडेजा 5*(6) धावांवर खेळत आहे.
94 धावांच्या स्कोअरवर भारताची चौथी विकेट पडली. इशान किशन 15 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. मेहदी हसनने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. तर 74 धावांवर भारतीय संघाची तिसरी विकेट पडली. लोकेश राहुल 39 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. महेदी हसनने त्याला शमीम हुसेनकरवी झेलबाद केले.
17 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. टिळक वर्मा नऊ चेंडूत पाच धावा करून बाद झाला. तनझिम हसनने त्याला क्लीन बोल्ड केले.266 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. तनझिम हसनने त्याला एनामुल हककरवी झेलबाद केले