मुंबई – आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा अखेर दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार असल्याचे स्पष्ट झाले. येत्या 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार असून त्यात परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यातील लढतीचा थरार 28 ऑगस्टला रंगणार आहे.
या स्पर्धेची सलामीची लढत 27 ऑगस्टला श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे होते मात्र, त्यांच्या देशातील राजकीय अस्थिरता तसेच वाढती महागाईमुळे नागरिकांचा रोष पाहता ही स्पर्धा त्यांच्याच यजमानपदाखाली मात्र, दुबईत हलवण्यात आल्याची माहिती आशिया क्रिकेट समितीने सांगितले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबरला होणार आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक (सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7ः30 वाजता)
– 27 ऑगस्ट श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
– 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
– 30 ऑगस्ट बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शारजा
– 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ, दुबई
– 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई
– 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ, शारजा
– 3 सप्टेंबर ब-1 विरुद्ध ब-2, शारजा
– 4 सप्टेंबर अ-1 विरुद्ध अ-2, दुबई
– 6 सप्टेंबर अ-1 विरुद्ध ब-1, दुबई
– 7 सप्टेंबर अ-2 विरुद्ध ब-2, दुबई
– 8 सप्टेंबर अ-1 विरुद्ध ब-2, दुबई
– 9 सप्टेंबर ब-1 विरुद्ध अ-2, दुबई
– 11 सप्टेंबर अंतिम लढत, दुबई
या स्पर्धेत बांगलादेशचा संघही सहभागी होत असून पात्रता स्पर्धेतील एक संघही या स्पर्धेत खेळणार आहे. सहभागी संघांची विभागणी दोन गटात करण्यात आली असून अ गटात भारत, पाकिस्तान व पात्रता स्पर्धेतून मुख्य फेरी गाठणारा संघ असेल. ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान व बांगलादेश यांचा समावेश करण्यात आला आहे.