बर्मिंगहॅम – बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची स्टार वेटलिफ्टिंगपटू हरजिंदर कौरने 71 किलो वजनी गटात ब्रॉंझपदकाला गवसणी घातली. कौरने एकूण 212 किलो वजन उचलत इंग्लंडच्या सारा डेव्हिस व कॅनडाच्या ऍलेक्सिस ऍशवर्थपेक्षा सरस कामगिरी करत पदक पटकावले.
या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक पदके याच खेळात मिळवलेल्या भारताच्या हरजिंदर हीने आणखी एका पदकाची भर घातली. यापूर्वी मीराबाई चानूने सुवर्ण, महाराष्ट्राच्या संकेत सरगरने रजत, गुरुराजा पुजारीने ब्रॉंझ तर बिंद्याराणी देवीने रजतपदक मिळवले होते. आतापर्यंत वेटलिंफ्टिंगमध्ये भारताने सात पदके प्राप्त केली आहेत.
Harjinder bagged 🇮🇳’s 9th Medal at @birminghamcg22 🤩🤩#HarjinderKaur all Smiles after winning a medal for INDIA 😃
Take a look 👇#Cheer4India#India4CWG2022@PMOIndia @ianuragthakur @NisithPramanik @SAI_Patiala @ddsportschannel @CGI_Bghm @SonySportsNetwk @CWG2022India pic.twitter.com/Nqi8mzkCH4— SAI Media (@Media_SAI) August 2, 2022
दरम्यान, हरजिंदरच्या या कामगिरीबद्दल पंजाब सरकारने त्याला रोख 40 लाख रुपयांचा पुरस्कार जाहिर केला आहे. हरजिंदर मायदेशी परतल्यावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हस्ते एका सन्मान सोहळ्यात हरजिंदरला या रोख पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.