पुणे – लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीच्या वतीने स्वर्गीय ला.सागर डोमसे यांच्या स्मरणार्थ लायन्स व्हेट्रेन टी-२० क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत बाश्री ब्लास्टर्स, क्लासिक पँथर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून दुसरा विजय मिळवला.
मोशी येथील हजारे मैदान व थेरगाव येथील व्हेरॉक मैदानावर सूरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात अरविंद चौहान (३-१९) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर क्लासिक पँथर्स संघाने लवास रॉयल्स संघाचा २ गडी राखून पराभव केला.
#U19WorldCup2024 #INDvIRE | भारताचा सलग दुसरा विजय, आयर्लंडचा 201 धावांनी केला पराभव…
दुसऱ्या सामन्यात विजय कोतवाल (नाबाद ३९ व ३-१७) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रॉयल पासलकर संघाने दिक्षित रॉयल्स संघाचा १ धावेने थरारक विजय मिळवला. अन्य लढतीत सुधीर साठे (३७ धावा व ३-११) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बाश्री ब्लास्टर्स संघाने गार्गी एज्यूकॉन संघाचा ७९ धावांनी पराभव केला.