पुणे :– लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीच्या वतीने ला.सागर डोमसे यांच्या स्मरणार्थ लायन्स व्हेट्रेन टी-२० क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत दिक्षित रॉयल्स संघाने तीन विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. मोशी येथील हजारे मैदान व थेरगाव येथील व्हेरॉक मैदानावर सूरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत नितीन काटे (२-१६ व १४ धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिक्षित रॉयल्स संघाने क्लासिक पँथर्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात प्रीतम कैया (२-३३ व २६ धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गार्गी एज्यूकॉन संघाने रॉयल पासलकर संघाचा ४ गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला.
निकाल (साखळी फेरी)
क्लासिक पँथर्स: १८.५ षटकात सर्वबाद ७८ (अरविंद चौहान २३, महेश भट २९, नितीन काटे २-१६, महावीर २-१९, पराभुत वि. दिक्षित रॉयल्स: १०.२ षटकात २ बाद ७९ (पुष्कराज जोशी नाबाद २७, नितीन काटे 14, शिवाजी माने 2-19); सामनावीर – नितीन काटे;
Khelo India Youth Games 2023 (Day 11) : महाराष्ट्राला 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके…
रॉयल पासलकर: 20 षटकात ८ बाद १५१ धावा (समाधान दांडेकर ४३, देवदत्त देवकर३९, सुरेश जैस्वाल २-४, प्रीतम कैया २-३३) पराभुत वि. गार्गी एज्यूकॉन: १६.२ षटकात ६ बाद १५२ (राजेंद्र मदने नाबाद ३९, राहुल कामठे ३१, योगेश माने, प्रीतम कैया २६, २-३८, सामनावीर – प्रीतम कैया