पुणे – लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी च्या वतीने स्वर्गीय ला.सागर डोमसे यांच्या स्मरणार्थ लायन्स व्हेट्रेन टी-२० क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत स्वयुश स्ट्रायकर्स, क्लासिक पँथर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात सौरभ रावलिया (४६ धावा व १-२५) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर क्लासिक पँथर्स संघाने गार्गी एक्युकॉन संघाचा ९ धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.
दुसऱ्या सामन्यात प्रशांत तेलंगी (नाबाद ५७ धावा व २-२१) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्वयुश स्ट्रायकर्स संघाने रॉयल पासलकर संघाचा ४० धावांनी पराभव करून विजयी सुरुवात केली.