Lions Premier League’ T20 Cricket Tournament :- लायन्स् इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३२३४ डी२ तर्फे आयोजित १४ व्या ‘लायन्स् प्रिमियर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत दादाज् इलेव्हन आणि नायर ईगल्स् संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.
सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत समीर तांबोळी याच्या अष्टपैलु खेळीमुळे दादाज् इलेव्हन संघाने कोकणे स्टार्स संघाचा ३ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कोकणे स्टार्सने १७५ धावांचे आव्हान उभे केले. गुलाब चव्हाण याने ७० धावांची तर, योगेश भोंगळे याने नाबाद ५८ धावांची खेळी केली. हे आव्हान दादाज् इलेव्हनने १८.४ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले.
समीर तांबोळी याने ४४ धावांची स्फोटक खेळी केली. त्याला विजय निंबाळकर (२६ धावा) आणि दिग्वीजय मोहीते (२४ धावा) यांनी मोलाची साथ दिली व संघाचा विजय सोपा केला. धीरज कदम याच्या ५६ धावांच्या खेळीच्या जोरावर नायर ईगल्स् संघाने न्युट्रीलिशियस् संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला.
IPL 2024 : प्रतीक्षा संपली…! अखेर उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, लोकसभा निवडणुकीमुळे…
पहिल्यांदा फलंदाजी करताना न्युट्रीलिशियस्ने १२९ धावा धावफलकावर लावल्या. हे लक्ष्य नायर ईगल्स्ने १३.५ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. राहुल कामठे याने नाबाद ६१ धावांची तर, धीरज कदम याने ५६ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.